आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपट 'सलमान सोसायटी'मध्ये झळकणार प्रसिद्ध बाल कलाकरांची टोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या ​या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला.'पढेगा इंडिया ​तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा असणार आहे. ३ दिवसांच्या पहिल्या शेडूल आणि नवोदित निर्देशक कैलाश पवार यांनी दुसऱ्या शेडूल मध्ये अंतर ठेवले.  ह्या अंतराचे कारण ऐसे की सलमान सोसायटी साठी बाल कलाकारांना तैयार करणे त्यासाठी कितेक वर्कशॉप घेण्यात आले आणि चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी सहभाग घेतला​.​ 

 

सलमान सोसायटी ह्या चित्रपटात बाळकडू आणि काही दिवसांपूर्वी  प्रदर्शित झालेला 'गावठी' चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारे गौरव मोरे आगामी चित्रपट 'सलमान सोसायटी'मध्ये एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोनकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार  ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्कर लोनकरने ह्या आदी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि .व चि .सौ. का, फिरकी आणि टी. टी. एम. एम चित्रपटात अभिनय केलाय तर  शुभम मोरे ह्याने हिंदी चित्रपट रईस मध्ये बालपणच्या शाहरुख़ खान ची भूमिका वटवली तसेच हाफ टिकिट, फास्टर फेने सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट , ताजमहल आणि येरे येरे पावसा मध्ये भूमिका केल्या आहेत.

 

सलमान सोसायटीचे एकूण ३ शेडूल होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई , नवी मुंबई च्या जवळील भागात होणार आहे तसेच चित्रपट ह्या वर्षी डिसेंबर मध्ये प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे. 

बातम्या आणखी आहेत...