आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • New Marathi Serial Aamhi Doghi Starts From 25th June Telly World : नवी मालिका 'आम्ही दोघी', ही आहे मालिकेची स्टोरी

Telly World : नवी मालिका 'आम्ही दोघी', ही आहे मालिकेची स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी युवा वाहिनीवर लवकरच 'आम्ही दोघी' ही नवीन मालिका दाखल होतेय. 'आम्ही दोघी' या मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या दोन बहिणी आणि त्यांच्या घट्ट नात्याभोवती फिरते. मीरा आणि मधुराचे पात्र अभिनेत्री खुशबू तावडे आणि शिवानी रंगोळे साकारत आहेत तसेच त्यांच्या सोबत विवेक सांगळेदेखील  या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.  याशिवाय सतीश पुळेकर, वर्षा दांदळे, विजय निकम या कलाकारांच्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

मालिकेतील दोन्ही बहिणी म्हणजे एकमेकांच्या गळ्यातील ताईत. एक अल्लड आणि मस्तीखोर तर दुसरी तितकीच शांत व समजूतदार. आई-बाबांविना मामाच्या छत्रछायेखाली वाढलेल्या मीरा आणि मधुरा एकमेकींच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतात. दृष्ट लागण्याजोगी ही बहिणींची जोडी कायम अशीच राहील का?


दोन बहिणींचे नाते उलगडणारी कथा प्रेक्षकांना 'आम्ही दोघी' या मालिकेद्वारे 25 जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता बघायला मिळणार आहे. 

 

बघा, 'आम्ही दोघी' मालिकेतील खुशबू आणि शिवानीची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...