आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview : नम्रताला कशी मिळाली ‘छत्रीवाली’ मालिका, जाणून घेऊयात तिच्याकडून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्रवाहवर १८ जूनपासून ‘छत्रीवाली’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून नम्रता प्रधान हा नवा चेहरा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या आणि स्वत:सोबत नेहमी छत्री बाळगणाऱ्या मधुराची व्यक्तिरेखा नम्रता साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नम्रताशी साधलेला संवाद...


- छत्रीवाली ही तुझी पहिलीच मालिका. या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
- लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. या मालिकेसाठी ऑडिशन सुरु असल्याचं मला समजलं आणि मी ऑडिशनसाठी फोटो पाठवले होते. त्यात माझी निवड झाल्यानंतर दोनवेळ लूक टेस्ट झाली. तो लूक योग्य वाटला सगळ्यांना आणि अपेक्षित असणारी छत्रीवाली त्यांना माझ्यात सापडली. छत्रीवालीमुळे माझं अभिनयाचं स्वप्न पूर्ण होतंय असंच म्हणावं लागेल.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, मालिकेविषयी आणखी काय म्हणाली नम्रता... 

बातम्या आणखी आहेत...