आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी टॉकीजचे नसते उद्योग नव्या रुपात आणि नव्या ढंगात! मराठीतील आघाडीचे दोन कलाकार करणार होस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तम कॉमेडी आणि मनोरंजन देणारा झी टॉकीज चा कार्यकम नसते उद्योग आता नव्या रुपात , नव्या ढंगात आणि नवीन वेळेवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे .प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी नसते उद्योग च्या मंचावर अवलिया कलाकार करणार नुसते उद्योग आणि त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील मराठी सिनेमाला महत्व देऊन , त्याला एक मोठं व्यासपीठ देण्यासाठीच झीटॉकीज ने हे अनोखे पाऊल उचलले आहे. हा कार्यक्रम मनोरंजन तर देणारच पण त्याबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील प्रदर्शित होणारे नवनवीन सिनेमे आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आणि त्यांच्यासोबत मजामस्ती करणार आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दोन उत्कृष्ट कलाकार आणि निवेदक क्रांती रेडकर आणि प्रसाद ओक. दोन निवेदक एकत्र असलेला हा पहिलाच मराठी चॅट शो असू शकेल. 

 

या कार्यक्रमात होणारे ऍक्ट हे त्या वेळी आलेला सिनेमा प्रमोट करण्यास मदत करेल. प्रसाद ओक आणि क्रांती रेडकर यांच्या सोबत , मनोरंजन करण्यासाठी अंशुमन विचारे, नम्रता आवटे, प्रभाकर मोरे, जयवंत भालेराव हे सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेत असतील. नसते उद्योग आता दर रविवारी संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

 

बातम्या आणखी आहेत...