आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला गश्मीर, म्हणाला, \'मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता गश्मीर महाजनी स्टार प्रवाहच्या 'प्रेमा तुझा रंग कसा' या मालिकेतून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने गश्मीरशी साधलेला संवाद...

 

प्रेमा तुझा रंग कसा या नव्या मालिकेचा तू एक भाग आहेस. त्याविषयी काय सांगशील?
- रोज एक कथा निवडली जाईल आणि नाट्यमय पद्धतीनं दाखवली जाईल. आपल्याला नात्यांमध्ये खूप गोष्टी खटकतात, मग ते पत्नीसह असो, आईसह असो... आपण ते स्वीकारायला तयार नसतो. वरवर पाहता ते प्रश्न म्हणून वाटतही नाहीत. ते खूप छोटे प्रश्न वाटत असल्यानं आपण त्याविषयी संवाद साधायला सुरुवात नाही केली. नेमकं काय चुकतंय, आपण एकमेकांपासून इतके का दुरावलोय, सोशल मीडियाद्वारे आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जवळ आलोय, पण प्रत्यक्षात एकमेकांशी बोलत नाही, संवाद साधत नाही. या सगळ्याविषयी मालिकेत आपण बोलणार आहोत. मात्र हे करताना कुठेही ज्ञानाचा डोस देण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. अभिनेता म्हणूनही या विषयी माझ्या मनात असलेली खदखद या कार्यक्रमातून मोकळी करणार आहे. 

 

 पुढे वाचा, गश्मीरने का केली या शोची निवड आणि यासह बरंच काही.. 

 

बातम्या आणखी आहेत...