आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • New Twist And Turn In Marathi Serial Radha Prem Rangi Rangali Telly World: \'राधा प्रेम रंगी रंगली\'मध्ये येणार नवा ट्विस्ट, प्रेम आणि राधाची होणार भेट

Telly World: \'राधा प्रेम रंगी रंगली\'मध्ये येणार नवा ट्विस्ट, प्रेम आणि राधाची होणार भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राधाच्या आयुष्यात सध्या बऱ्याच घटना घडत आहेत तिच्यासमोर बऱ्याच गोष्टींचा उलघडा होत आहे, तिच्यासमोर अनेक सत्य येत आहे. राधा सध्या प्रेमा म्हणून इंदूर येथील एका इस्पितळात परिचारिकेचे काम करत असतानाच इस्पितळाचे मालक आनंद नाडकर्णी यांच्या विनंतीला स्वीकारत राधा त्यांच्या वडिलांची देखरेख आणि सेवा करण्यासाठी त्यांच्या घरी रहाण्यास तयार झाली होती. यामध्येच राधाला प्रेमच्या आईचे म्हणजेच माधुरीबद्दलचे खूप मोठे सत्य समोर आले. तर दुसरीकडे प्रेम आणि राधाची भेट होता होता राहून गेली. परंतु राधा समोर प्रेम आणि दीपिकाच्या नात्याचे सत्य समोर आले. राधाला हे कळाले आहे की, आता प्रेमने तिला विसरून दीपिकाचा स्वीकार केला आहे. परंतु आनंद नाडकर्णी यांना प्रेमा म्हणजेच राधाचा नवरा प्रेम कोण आहे हे कळाले आहे. यामुळे राधाला आश्चर्य वाटले आहे.  

 

दीपिकाच्या जाळ्यात अडकला आहे प्रेम... 
प्रेम देवयानी आणि दीपिकाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकून गेला आहे. त्याला सत्य काय आहे हे देखील जाणून घ्यायचे नाहीये. त्याने दीपिकाला आता स्वत:च्या घरामध्ये रहाण्यासाठी आणले आहे. माधुरीला ही गोष्ट पटलेली नाही. घरामध्ये येताच ज्याप्रकारे ती माधुरीशी बोलली ते माधुरीला पटले नाही. दीपिकाच्या बोलण्याने माधुरी बरीच दुखावली गेली. दीपिकाने तिला राधा मेली असून आता तू देखील लवकरच मरणार आणि तुझा नवराच तुला मारणार असे बोलल्यावर माधुरीने दीपिका एक थोबाडीत मारली कारण हे सगळे ऐकून घेणे तिच्यासाठी असह्य झाले. 

 

एकंदरीतच आता  राधा आणि प्रेमची आता लवकरच भेट होणार असून ती कधी होणार ? राधा आणि प्रेमची भेट आनंद नाडकर्णी घडवून आणणार का ? प्रेम राधाला काय बोलणार ? प्रेम समोर आल्यावर राधा प्रेमला दीपिकाचे सत्य सांगणार का ? प्रेम राधावर विश्वास ठेवणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं  मालिकेच्या येणा-या भागांमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...