आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: 'गुढीपाडव्याच्या' मुहूर्तावर 'देवाशपथ' आणि 'बापमाणूस'मध्ये येणार हे ट्विस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बापमाणूस' आणि 'देवाशपथ' या मालिकेचे पोस्टर - Divya Marathi
'बापमाणूस' आणि 'देवाशपथ' या मालिकेचे पोस्टर

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झी युवा वाहिनीवर गाजत असलेल्या देवाशपथ आणि बापमाणूस या दोन्ही मालिकांमध्ये नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. 


काय घडणार आहे 'देवाशपथ' या मालिकेत... 
देवाचं अस्तित्व खरंच आहे की नाही? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक काय? आस्तिक असणं योग्य आहे की नाही? समाजामध्ये सुरु असलेल्या या द्वंद्वावर भाष्य करणाऱ्या झी युवा या वाहिनीवरील "देवाशपथ" या मालिकेतील श्लोक (संकर्षण कऱ्हाडे) हा नास्तिक आहे. त्याचा घरच्यांचा अति देव-देव करणं त्याला अजिबात पटत नाही.

 

कुहू (कौमुदी वलोकर) आपल्या बाबाला श्लोकबद्दल सांगावं, की नाही या संभ्रमात गुंतत चालली आहे. कुहूच्या बाबाला श्लोक अजिबात आवडत नाही पण श्लोकशिवाय ती राहू पण शकत नाहीये. ज्या नारळावरून श्लोकच्या भविष्याची दिशा ठरणार आहे ते अण्णा महाराजांनी श्लोकच्या घरात ठेवलेलं आहे, जे गुढीपाडव्याच्या दिवशी फोडलं जाणार आहे. हे नारळ फोडताना कुहू तिथे असायला हवी असं अण्णा महाराजांनी श्लोकच्या वडिलांना सांगितल्यामुळे कुहू गुढीपाडव्याच्या दिवशी दशपुत्रेंच्या घरी जाणार आहे. 


पुढे वाचा, मालिकेत गुढीपाडव्याच्या दिवशी कोणकोणत्या प्रश्नांची मिळणार आहेत उत्तरे.. 

बातम्या आणखी आहेत...