आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी… अजिंक्यसमोर शीतल प्रेमाची अशी थेट कबुली देणार आहे. टेलिव्हिजनवरची खट्याळ जोडी म्हणजे ‘लागिर झालं जीचे अजिंक्य आणि शीतल यांचं प्रेम आता एका नव्या वळणावर पोहोचत आहे. दोघांनीही आपण एकमेकांना आवडत असल्याची मूक कबुली दिली. दोघांमध्ये प्रेमळ नोकझोक देखील होताना दिसली. पण अजूनही दोघांनी एकमेकांना उघडपणे प्रेमाची कबुली दिली नाही. त्यामुळे आता शीतलने ठरवलं की अजिंक्यला आपल्या मनातली भावना उघडपणे सांगायची.
शीतल पवारने एखादी गोष्ट ठरवली की मग ती झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे शीतलचा प्रपोजसुद्धा तिच्यासारखाच लाखात एक होणार आहे. चक्क आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन शीतल अजिंक्यला प्रपोज करणार आहे. येत्या सोमवार ते बुधवारच्या भागात आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेली शीतल आणि अजिंक्यला प्रपोज करण्याची तिची धडपड आपल्याला पाहायला मिळेल.
पुढे वाचा, शीतलच्या मैत्रिणीने दिला तिला एक खास सल्ला...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.