आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : फाइट सीन शूट करताना \'अजिंक्य\'ला दुखापत, मालिकेत येणार \'हा\' ट्वीस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंक्य-शीतलच्या प्रेमातील व्हिलन हर्षवर्धन, फाईट सीन शूट करताना 'अजिंक्य'ला दुखापत 
झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागिरं झालं जी' या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक मोठा ट्वीस्ट बघायला मिळणार आहेत. अलीकडच्या भागात अजिंक्यने  शीतलला लग्नाची मागणी घातली  असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. त्यांच्या नात्याविषयी जेव्हा हर्षवर्धनला कळते तेव्हा गोष्टी वेगळ्याच थराला जाऊन पोचतात.

 

येणार आहे ट्वीस्ट..

हर्षवर्धनचे शीतलवरील एकतर्फी प्रेम असल्यामुळे जेव्हा त्याला शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळते, तेव्हा त्याचा राग अनावर होतो. हर्षवर्धन अजिंक्यला मारण्यासाठी गुंड पाठवतो. भारतीय सेनेत भरती झालेला आपला अजिंक्य या सगळ्या परिस्थितीला कसा सामोरे जाणार हे मालिकेच्या येणा-या भागांमध्ये बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

 

फाइट सीन शूट करताना जखमी झाला नितिश चव्हाण..  
या मालिकेत अभिनेता नितिश चव्हाण अजिंक्यची भूमिका साकारतोय. हर्षवर्धनने पाठवलेल्या गुंडांशी अजिंक्य दोन हात करताना दिसणार आहे. मार्शल आर्टमध्ये एक्स्पर्टस असलेल्या विकास आणि राकेश या फाईट मास्टर्सच्या देखरेखीखाली हा फाइट सिक्वेन्स चित्रीत करण्यात आला आहे आणि त्यांनी अजिंक्याला या सिक्वेन्ससाठी योग्य प्रशिक्षण दिले आहे. फाईट सिक्वेन्स शूट करताना अजिंक्यला अनेक ठिकाणी खरचटले होते, पण तरीही त्याने दुखापतीकडे लक्ष न देता मोठ्या जिद्दीने पहाटे 4 वाजेपर्यंत फाईट सिक्वेन्सचे चित्रीकरण पूर्ण केले. 'लागिरं झालं जी'मधला पहिला फाइट सीन येत्या 26 मार्च रोजी प्रेक्षकांना मालिकेत बघायला मिळणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, 'लागिरं झालं जी' या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांचे रोमँटिक क्षण... 

बातम्या आणखी आहेत...