आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: जयडी आणणार शीतल-अजिंक्यच्या सुखी संसारात अडथळे, येणार नवा ट्विस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जी' या मालिकेत अलीकडेच शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.

 

अजिंक्य शीतलचं लग्न तर झालं पण जयश्री घरात परत आल्याने सगळ्यांना टेन्शन आलं आहे. तिचा नवरा तिला परत घरी घेऊन जायला तयार नाही. अजिंक्य शीतलच्या वैवाहिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्यासाठी जयश्रीने हे सगळं जाणीवपूर्वक घडवून आणलंय.


शीतल आणि अजिंक्यच्या संसारात विष कळवण्यासाठी जयडी कुठल्या ठरला जाईल? शीतल तिचा संसार सावरण्यात यशस्वी ठरेल का? हे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळेल.


पाहुयात, अजिंक्य आणि शीतल यांच्या लग्नाचा अल्बम...

 

बातम्या आणखी आहेत...