आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tellyworld: रंजक वळणावर \'राधा प्रेम रंगी रंगली\' मालिका, राधाच्या जीवाला तिच्याच पत्रिकेमुळे धोका!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरील मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत ज्यामुळे मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी प्रेमच्या हातून घडलेल्या एका चुकीची शिक्षा राधाला भोगावी लागली. याच घटनेपासून मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. ज्यामध्ये अनेक निरुत्तरित प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. राधा परत सासरी येणार का ? दीपिका तिच्या आणि प्रेमच्या लग्नाचे सत्य कळणार का ? राधाच्या पत्रिकेतील दोषामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होणार का ? माधुरीची या सगळ्यावर काय प्रतिक्रया असेल ? देशमुखांची संपूर्ण संपत्ती राधाच्या नावावर झालेली आहे हे कळल्यावर प्रेम काय करेल ? या सगळ्यामध्ये प्रेमला राधा प्रती आणि तिच्या कुटुंबाविषयी वाटणारी जबाबदारी तो कसा पूर्ण करेल ? हे सगळं जाणून घेणे आता औत्सुक्याचे आहे. 

 

प्रेमला आपल्या बहिणीचे म्हणजेच अन्विताचे सत्य ती स्वत: घरी येऊन सांगते आणि ते कळल्यावर प्रेमला अन्विताचा प्रचंड राग येतो आणि रागाच्या भरात तो अन्विताला मारण्यासाठी हात उगारतो आणि राधा दोघांच्यामध्ये येते आणि प्रेमचा हात तिला लागतो ज्यामुळे तिच्या कानाला ईजा होते आणि तिला ऐकू येण बंद होतं. या घटनेचा प्रेमवर खूप परिणाम होतो आणि हे सगळ त्याच्यामुळे झाले आहे असे त्याला वाटते. आणि त्या दिवसापासून त्याचे राधाच्या प्रती वागण्यामध्ये खूपच बदल होतो. राधाच्या प्रकृतीची वाटणारी काळजी, तिच्या समजूतदार पणामुळे प्रेमला अजूनच खजील व्हायला होतं. राधा लवकर बरी व्हावी म्हणून प्रेम राधा सोबत चाळीमध्ये जाऊन राहायला लागतो. या दरम्यान प्रेम हळूहळू राधाच्या घरातल्यांच्या जवळ येतो. त्याच्यामध्ये झालेला वा होणारा बदल त्याच्या ऑफिसमधील शिर्केंना मात्र दिसून येतो. परंतु राधाची या सागळ्यामागील भूमिका वेगळीच आहे हे कळल्यावर प्रेमला धक्का बसतो. राधाने घातलेल्या अटी खातर आणि तिचे ऑपरेशन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून प्रेम दीपिकाशी खोटे लग्न करतो. आता  या लग्नाचे सत्य दीपिका समोर कसे येईल ? माधुरीचे यावर काय म्हणणे असेल ? कसं प्रेम हे सगळे सांभाळुन घेईल ? प्रेम आणि राधा यामधून कसा मार्ग काढतील ?

बातम्या आणखी आहेत...