आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण'ने चाहतीला मिळवून दिला सोन्याचा हार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क :  टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीनं याचा प्रत्यक्ष अनुभवच घेतला. स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेनं प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला, सोबतच रेवती आणि श्रीधर या जोडीला भेटण्याची संधीही मिळाली. 


स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेसाठी एक कॉन्टेस्ट घेण्यात आली होती. या कॉन्टेस्टमध्ये अचूक उत्तर देणाऱ्याला छोटी मालकीणचा मानाचा सोन्याचा हार जिंकण्याची संधी देण्यात आली होती. या कॉन्टेस्टला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात नंदूरबारची प्रीती नांद्रे भाग्यवान विजेती ठरली. 


'छोटी मालकीण' ही मालिका मला फार आवडते. ही कॉन्टेस्ट जाहीर झाल्यावर मी त्यात सहभागी व्हायचं ठरवलं आणि उत्तर दिलं. मात्र, मला बक्षीस मिळेल याची अपेक्षाच नव्हती. मानाचा सोन्याचा हार मिळणं हे माझ्यासाठी खरोखरच प्लेझंट सरप्राईज आहे. हा आनंद मला मिळवून दिल्याबद्दल छोटी मालकीणचे आभार मानावेसे वाटतात,' अशी भावना प्रीती नांद्रे यांनी व्यक्त केली.  

बातम्या आणखी आहेत...