आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर'च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क : कलर्स मराठी वरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर” या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर नंतर पुण्यामध्ये या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला. मुलांचा उत्साह आणि त्यांची तयारी वाखाणण्याजोगी होती. सगळीच मुलं प्रचंड तयारीने आली होती हे त्यांच्या गाण्यावरूनच कळत होते. कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये 500 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. पुणे येथील इ. एस. सेकंडरी स्कूल, 486 सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल कॅम्पस, टिळक रोड येथे या ऑडिशन्स पार पडल्या. या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या पुणे केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडीशन्ससाठी आठ स्पर्धक निवडण्यात आले. श्रीनिधी देशपांडे, नंदिनी गायकवाड, ईशिता मोडक, अक्षय चारभाई, धिरज शेगर, चैतन्य देवडे, आदी भारतीया आणि अभिषेक कांबळे यांची निवड झाली आहे.  

बातम्या आणखी आहेत...