आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : संभाजी राजे व समर्थ रामदासांची भेट घडणार का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यातील दिलेरखान प्रकरण सुरू होण्यापूर्वी संभाजी राजांना सज्जनगडावर समर्थ रामदासांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. असा उल्लेख अनेक पुस्तकांत आहे, तसे महाराजांचे एक पत्रही आहे.  त्यामुळेच आता मालिकेत  समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका दिसणार का ?याविषयी समर्थ भक्तांच्या मनात मोठे कुतुहल आहे. समर्थ रामदास स्वामींच्या शिवचरित्रातील भूमिकेविषयी अनेक मतमतांतरे असल्यामुळे हा टप्पा कशा पद्धतीने पडद्यावर येणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शुक्रवारी १३ जुलैला या भागाचा उलगडा होईल.

आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं... या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय.

बातम्या आणखी आहेत...