आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निपुण धर्माधिकारीचा \'ठप्पा\' रजत कमळाचा मानकरी, या मराठी चित्रपटांचीही राष्ट्रीय पुरस्कारात बाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीच्या 'ठप्पा' या चित्रपटाला रजत कमळ पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाला नर्गिस दत्त अवॉर्ड फॉर बेस्ट फिचर फिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते सुमीतलाल पोपटलाल हा आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांना प्रत्येकी दीड लाख रुपये आणि रजत कमळ पुरस्काररुपी मिळणार आहे. 
 
निपुणने ट्वीटरवर पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्वीटवर लिहीले की, So..this happened today..!! <3

 

कोण आहे निपुण धर्माधिकारी... 
मराठी इंडस्ट्रीतील तरुण आणि टॅलेंटेड दिग्दर्शक म्हणून निपुणचे नाव घेतले जाते. निपूणने आतापर्यंत अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांत काम केले आहे. मुळचा मुंबईचा असलेल्या निपूणने 2003 साली अभिनय करण्यास सुरुवात केली होती. निपूणची नाटक कंपनी ही पुणे येथील एक थिएटर कंपनी आहे आणि त्यातून निपूण दर्जेदार नाटकांच्या दिग्दर्शन आणि निर्मितीचे काम करत असतो. निपूणने 'बापजन्म' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे आणि त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला आहे. 

 

'ठप्पा'सह या मराठी चित्रपटांनाही मिळाले पुरस्कार... 

> सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्युभोग
> सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) - मयत - सुयश शिंदे
> सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा- राजेंद्र जंगले

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कच्चा लिंबू ते म्होरक्या मराठी चित्रपटांना मिळाले कोणते पुरस्कार...

बातम्या आणखी आहेत...