आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मराठीतही सुरु होणार 'बिग बॉस', सलमानने केली घोषणा, रितेशकडे सुत्रसंचालन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' रिअॅलिटी शोचे 11वे सीझन काल संपले. पण या शोच्या ग्रँड फिनालेदरम्यान अभिनेता सलमान खानने अशी एक घोषणा केली ज्यामुळे सर्वच मराठी प्रेक्षकांचा आनंद द्वीगुणीत झाला. हिंदी आणि तामिळप्रमाणेच आता मराठीतही बिग बॉस सुरु होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने बिग बॉसचा 11वा सिझन जिंकला आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचा आनंद दुणावला आहे. 

 

मराठी बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मराठमोळा आणि सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुखकडं दिली जाण्याची शक्यता आहे. रितेशनं याआधी 'विकता का उत्तर' या टीव्ही शोचे सूत्रसंचालनही केले होते.

 

शिल्पा शिंदे विनर ठरल्यानंतर सलमान खानने शिल्पाला मराठी बिग बॉसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आता या नवीन शोमध्ये कोणते मराठी कलाकार येणार, या शोची थीम काय असणार याबद्दल मराठी प्रेक्षकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, हिंदी आणि तामिळ बिग बॉस शोचे होस्ट...

बातम्या आणखी आहेत...