आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिस इंडिया\' होत्या नूतन, 14व्या वर्षी केला चित्रपटात डेब्यू, स्वीमसूट घालून केले होते चकीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आज अभिनेत्री नूतन यांची 28 वी डेथ अॅनिवर्सरी आहे. 21 फेब्रुवारी 1991 रोजी वयाच्या 54व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला. 1936 मध्ये मुंबईत जन्मलेल्या नूतन यांचे वडील दिग्दर्शक-कवी कुमारसेन होते. तर आई शोभना समर्थ अभिनेत्री होती. चित्रपटात स्विमसूट घालणारी नूतन पहिल्याच अभिनेत्री होत्या. नूतन यांचा मुलगा अभिनेता मोहनीश बहल आहे तर ती काजोलची मावशी आहे. केवळ 16 वर्षाच्या असताना नूतन बनल्या मिस इंडिया...

 

खूप कमी जणांना माहीत आहे की नूतन यांनी 1952 साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्या साली दोन मिस इंडिया पेजेंट्स झाले होते. त्यातील एक इंद्राणी रहमान तर दुसरी विजेती नूतन होती. या कार्यक्रमातल नूतन यांना मिस मसूरीचा सन्मान मिळाला होता. त्यावेळी त्यांचे वय केवळ 16 वर्षे होते. केवळ 14 वर्षाची असताना नूतन यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. 1950 साली आलेला चित्रपट 'हमारी बेटी' त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे प्रोडक्शन त्यांची आई शोभना समर्थ यांनी केले होते.

 

स्विमसूट घालून प्रेक्षकांना केले होते आश्चर्यचकीत..
सन 1958 साली प्रदर्शित झालेला 'दिल्ली का ठग' मध्ये नूतन यांनी स्विमसूट घातला होता. 'बारिश' चित्रपटात अनेक बोल्ड दृश्येही त्यांनी दिली. नूतन यांचे म्हणणे होते की अभिनेत्री असल्याने कथेच्या मागणीनुसार असे दृश्ये देण्यास त्यांची काही हरकत नाही. यानंतर नूतन यांच्यावर टीकाही झाली पण नंतर विमल रॉय यांच्या सुजाता आणि बंदिनी मधील त्यांच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर त्यांची बोल्ड अभिनेत्रीची प्रतिमा बदलली.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, नूतन यांचे त्यांच्या फॅमिलीसोबतचे काही Rare Photos...

बातम्या आणखी आहेत...