आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या नूतन यांची \'ही\' नात पाहिली का तुम्ही? त्यांच्याप्रमाणेच सुंदर आणि नावही आहे अनोखे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत अभिनेत्री नूतन यांची आज डेथ अॅनिवर्सरी. 21 फेब्रुवारी 1991 रोजी वयाच्या 54व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला. अभिनय आणि सौंदर्य या दोघांचेही वरदान नूतन यांना लाभले होते. बॉलिवूडमधील सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून त्यांचे नाव आजही घेतले जाते. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अभिनयाचा वारसा मुलगा मोहनीश बहल पुढे चालवत आहे.

 

सध्या इंटरनेटवर मोहनीश बहलची मुलगी नूतन यांची नात ट्रेंडिंग आहे. नूतन यांच्याप्रमाणेच त्यांची नात प्रनूतन सौंदर्यवती आहे. सोशल मीडीयावर सध्या तिचे अनेक फोटो दिसून येत आहेत.

नूतन यांची नात प्रनूतन बहल चित्रपटात येणार की नाही याची कोणतीही माहिती अजून नाही पण सध्या तिचे फोटो इतके व्हायरल होत आहेत की ती चित्रपटांत येण्याअगोदरच प्रसिद्ध झाली आहे.

सध्या 24 वर्षाची असलेली प्रनूतन इतर स्टारकिडप्रमाणे रुपेरी पडद्यावर दिसणार की नाही, हे येणारी वेळच सांगेल, पण तोपर्यंत पाहा तिचे काही खास PHOTOS..

 

PHOTOS पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा..

बातम्या आणखी आहेत...