आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझी युवावरील आघाडीची मालिका 'फुलपाखरु'मधील मानस आणि वैदेही यांच्या प्रेमकथेने फुलणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. नुकतेच या मालिकेत मानस आणि वैदेही यांच्या नात्यात गैरमसज निर्माण करुन तोडण्याचा प्रयत्न माया करते पण यात ती अपयशी होते.
आता या मालिकेत एका नव्या रॉकी नावाच्या पात्राची एंट्री झाली आहे आणि तो आहे ओंकार राऊत. रॉकी हा मानसीच्या कॉलेजमधील विद्यार्थी आहे आणि त्याचा रॉक बँडही दाखवण्यात आला आहे. रॉकी हा तिरसट स्वभावाचा आहे आणि संगीतासोबत छेडछाड केलेली त्याला अजिबात आवडत नाही. वैदेही आणि ओंकार हे एकमेकांच्या एकदम विरुद्ध स्वभावाचे असल्याने त्यांचे खटके उडतात. रॉकीची अकड दूर करण्यासाठी वैदेहीसुद्धा तो ज्या स्पर्धेत भाग घेणार आहे त्यात भाग घेते आणि ती स्पर्धा तीच जिंकणार असे त्याला चॅलेंज करते.
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'फुलपाखरु' मालिकेतील एक दृश्य..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.