आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठी बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसत आहेत. अलीकडेच अनसिन अनदेखाच्या वुटवरील नव्या क्लिपमध्ये सई लोकुर आणि पुष्कर जोग त्यांच्या कुटुंबाविषयी खासगी आणि भावनिक संवाद साधत आहेत. पुष्कर आणि सई एकमेकांशी मनातलं बोलत आहेत. यावेळी पुष्कर त्याच्या कुटुंबाशी तो किती जोडलेला आहे आणि त्या सगळ्यांचं त्याच्या आयुष्यात किती महत्त्व आहे, ते सईला सांगतो. पुष्कर सईशी आपल्या वडिलांच्या मृत्यूबाबतही बोलतो आहे.
'नच बलिये'च्या ग्रॅण्डफिनालेच्या दिवशीच झाले होते वडिलांचे निधन...
'नच बलिये'च्या महाअंतिम सोहळ्याच्या शुटिंगमध्ये बिझी असताना, त्याच रात्री त्याच्या वडिलांचं कर्करोगामुळे निधन झालं, या काळात तो एकाच वेळेस दोन सिरियल्स आणि एका सिनेमाच्या कामात व्यग्र होता, असंही यावेळी त्याने सांगितलं. वडिलांना नच बलियेची विनिंग ट्रॉफी दाखवता न आल्याची खंतही त्याला आहे. पुष्करने त्याच्या वडिलांना गमावलं आणि त्यानंतर त्याला स्वतःमधलं काहीतरी गमवल्यासारखं वाटतंय.
कुटुंबच आहे शाश्वत....
पुष्कर म्हणतो की, संपूर्ण जगात कुटुंबच वास्तव आणि शाश्वत आहे, बाकी काहीही केवळ भौतिक आहे आणि वेळोवेळी बदलत जाणारं आहे. त्याला असंही वाटतंय, की आपल्या मित्रांपैकी कुणी नकारात्मक राहू नये, यामुळे अनेक गोष्टींवरील लक्ष विचलित होतं. त्यापेक्षा तुम्ही असे निवडक मित्र जोडा, जे तुमच्या बरोबर कुठेही आणि कायम असतील.
आयुष्यातील चार वर्षे घालवली वाया..
पुष्करने सांगितले, की आयुष्याची तब्बल चार वर्षं त्याने नकारात्मकतेमुळे वाया घालवलीत आणि या काळात तो कर्जात बुडाला होता. अर्थात आता तो त्यातून बाहेरही आला आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, पुष्कर जोगच्या खासगी आयुष्याविषयी आणखी बरंच काही... आणि सोबतच बघा पुष्करच्या लग्नाचे निवडक फोटोज..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.