आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी अरेंज मॅरेजची समर्थक', लग्नानंतर जीवनात झालेल्या बदलांविषयी सांगतेय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनेमेंट डेस्क - मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लग्नानंतर प्रथमच व्हॉट्सअप लग्न या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रार्थनाने दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी तिच्या फॅन्ससोबत शेअर केल्या. यावेळी लग्नानंतर तिच्यात आणि आयुष्यात झालेला बदल सांगत अरेंज मॅरेजचे नेहमीच समर्थन करते असे तिने सांगितले. पतीसोबत तिच्या नात्याबद्दलही मोकळेपणाने बोलली प्रार्थना बेहेरे. आईवडिलांनी निवडलेला मुलगा योग्यच..
 
प्रार्थनाला तिच्या विवाहाबद्दल विचारले असता तिने तिचे अरेंज मॅरेज असल्याचे सांगितले. आईवडिलांनी निवडून दिलेला मुलगाच योग्य असतो या निर्णयावर ठाम असलेली प्रार्थना म्हणते, "माझा अरेंज मॅरेजवर पूर्ण विश्वास आहे. घरच्यांच्या पसंतीने केलेले लग्न नेहमीच योग्य अशा मताची मी आहे त्यामुळे मी कधीही अभिनेता किंवा माझ्या क्षेत्रातील जोडीदार निवडला नाही. अभिषेकसुद्धा माझ्याच क्षेत्रात आहे तरीही आमचे पूर्णपणे अरेंज मॅरेज आहे. आमच्या भेटीच्या 15 दिवसानंतरच आमचा साखरपुडा ठरवण्यात आला."

 

लग्नानंतर बदलले संपूर्ण आयुष्य...
प्रार्थना बेहेरे सांगते, "लग्नाअगोदर मी मुंबईत एकटे राहत असे तेवल्हाल कधीही उठा आणि कॉफी प्यायला जा, फिरायला जा असे होत असे. अनेक दिवस मी जेवण बनवायचा कंटाळा म्हणून नुडल्सवरच काढले आहेत पण लग्नानंतर आता माझ्यात शिस्तबद्धता आली आहे तसेच अभिषेक स्वभावाने रागीट आहे त्याचा राग तो कमी करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो." 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थना बेहेरेचे तिच्या पतीसोबतचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...