आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:वयाच्या 45व्या वर्षीही फारच फिट आहे प्रसाद ओक, भावाच्या मैत्रिणीसोबत केला आहे प्रेमविवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मराठीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक आज त्याचा 45वा वाढदिवस साजरा करत आहे. 17 फेब्रुवारी 1972 रोजी पुणे येथे जन्मलेल्या प्रसादने त्याच्या अभिनयकौशल्याने आणि लुक्सने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. केवळ अभिनेताच नव्हे तर 'अवघाची हा संसार' यांसारखी मालिका आणि '7, रोशन व्हिला' यांसारख्या चित्रपटातून त्याने त्याचे खलनायिकी रुपही दाखविले आणि ते प्रेक्षकांनी स्वीकारलेही. 

 

वयाच्या 45व्या वर्षात फारच फिट आहे प्रसाद..
प्रसादकडे पाहिल्यावर कोणालाही विश्वास करणार नाही की त्याने त्याच्या वयाचे 45 वर्षे पूर्ण केली आहे. योग्य आहार आणि व्यायाम त्याच्या फिट बॉडीचे रहस्य असल्याचे प्रसाद सांगतो. 

 

पुण्यात केले शिक्षण..
प्रसादने त्याते शालेय शिक्षण भावे हायस्कुल पुणे येथून पूर्ण केले आणि त्यानंतर बीएमसीसी कॉलेजमधून ग्रॅज्युएशनही पूर्ण केले. प्रसादला लहानपणपासूनच अभिनेता बनायचे होते आणि त्यादृष्टीने त्याने लवकरच छोटे-मोठे रोल करण्यास सुरुवात केली. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली कारकिर्दीची सुरुवात...

बातम्या आणखी आहेत...