आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - कलर्स मराठीवर नुकताच सुरु झालेला ‘तुमच्यासाठी काय पन’ हा कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहेत. या मंचावर महाराष्ट्राचे लाडके आणि अमाप लोकप्रियता मिळवलेले विनोदवीर एका पेक्षा एक स्कीट सादर करून सगळ्यांच हसवतात. त्यांच्या विनोदांच्या हास्याचे स्फोट अवघ्या महाराष्ट्राला तर हसवतातच त्याचबरोबर मंचावर येणाऱ्या कलाकारांना देखील हसण्यास भाग पाडतात. “तुमच्यासाठी काय पन” या कार्यक्रमाच्या गाजावाजा जंक्शनवर दर आठवड्यामध्ये वेगवेगळे कलाकार हजेरी लावतात. यावेळेस मराठी सिनेसृष्टीत तसेच मराठी नाट्यसृष्टीतले विक्रमादित्य आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेला अभिनेते प्रशांत दामले तुमच्यासाठी काय पनच्या मंचावर आले आणि त्यांनी पुन्हाएकदा सगळ्यांची मने जिंकली. याचबरोबर “अस्स सासर सुरेख बाई” कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे या मालिकेमधील प्रेक्षकांचे आवडते कलाकार देखील गाजावाजा जंक्शन वर आले आणि यांनी मिळून बरीच धम्माल मस्ती देखील केली.
कलर्स मराठीवरील आज काय स्पेशल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सध्या प्रशांत दामले करत असून संशय कल्लोळ आणि साखर खाल्लेला माणूस ही त्यांची दोन्ही नाटकं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. साखर खाल्लेला माणूस नाटकामधील शुभांगी गोखले, चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक) आदी उपस्थित होते तर संशय कल्लोळ मधील राहुल देशपांडे, उमा देसाई इत्यादी उपस्थित होते. भागाची सुरुवात प्रशांत दामलेंच्या गाण्याने झाली. तसेच तुमच्यासाठी काय पन च्या टीमने प्रशांत दामलेंना एक सुंदर सरप्राईझ दिले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर आधारित एक AV बनवली आणि ती बघून प्रशांत दामले खूप भाऊक झाले. शुभांगी गोखले यांनी देखील काही आठवणी सांगितल्या तर मंचावर उपस्थित सुप्रसिध्द संगीतकार अशोक पत्की यांनी “मिले सूर मेरा तुम्हारा” या गाण्या दरम्यानच्या आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.
अस्स सासर सुरेख बाई मालिकेची टीम देखील गाजावाजा जंक्शन वर या आठवड्यामध्ये आली. संपूर्ण टीमने मंचावर बरीच धम्माल मस्ती केली. विभाने संतोष जुयेकरची मिमिक्री केली. बऱ्याच आठवणी देखील शेअर केल्या. गाजावाजा जंक्शनवर पहिल्यांदाच २२ जणांची टीम हजर होती. त्यामुळे हे दोन्ही भाग बघायला आणि त्यांच्या आठवणी, किस्से ऐकायला बरीच मजा येणार आहे हे नक्की !
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.