आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आम्ही दोघी'च्या प्रमोशनमध्ये दिसला प्रियाचा मोहक अंदाज, पिंक ड्रेसमध्ये दिसली फारच सुंदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी मराठी चित्रपट 'आम्ही दोघी'चे प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. येत्या 16 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. त्यानिमित्त प्रिया बापटने प्रमोशनचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती भूषण प्रधान आणि मुक्ता बर्वेसोबत दिसत आहे. पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये असलेली प्रियाचे यावेळी लोभसवाणे रुप दिसले.

 

आम्ही दोघी' मालिकेत मुक्ता बर्वेने अमला तर प्रिया बापटने सावित्री सरदेसाईची भूमिका केली आहे. चित्रपटात आजच्या तरुणींच्या नातेसंबंधाची गोष्ट सांगितली आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी या सर्वच नात्यांना स्पर्श केला आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि किरण करमरकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात मुक्ता आणि प्रिया एकदम भिन्न टोकाच्या स्त्रीया दाखवण्यात आल्या आहेत. या दोघी प्रथमच एका चित्रपटात झळकत असल्याने प्रेक्षकांची याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मुक्ता-प्रिया तसेच भूषणचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...