आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्रा तिसऱ्या मराठी चित्रपटासाठी सज्ज, घेऊन येतेय 'फायरब्रँण्ड', पाहा कोण आहेत कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'काय रे रास्कला', राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'व्हेंटीलेटर'नंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता तिसरा मराठी चित्रपट निर्मितीमध्ये गुंतली आहे. प्रियांका आता नवीन मराठी चित्रपट फायरब्रँण्ड ची निर्माती बनली आहे. Purple Pebble Pictures या प्रोडक्शन कंपनीची मालकीण असलेली प्रियांका चोप्राच्या या मराठी चित्रपटाची दिग्दर्शिका अरुणाराजे पाटील असणार आहे.

 

या चित्रपटात उषा जाधव, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

 

प्रियांकाचा पहिला मराठी चित्रपट 2016 साली आणि 'काय रे रास्कला' हा चित्रपट 2017 साली रिलीज झाला होता. विशेष म्हणजे, अरुणाराजे पाटील हेसुद्धा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. त्यांनी शक(1976), घेराई(1980), आणि रिहाई(1988) यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. 

 

याबाबत बोलताना अरुणाराजे पाटील यांनी सांगितले की, "मला आनंद होतो की प्रियांका चोप्रा आणि मधु चोप्रा या प्रादेशिक सिनेमांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे." 

 

प्रियांका प्रादेशिक भाषांमध्ये सध्या केवळ मराठी चित्रपट फायरब्रँण्डसाठी काम करत आहे. सध्या ती हिंदी सिनेमा न करता केवळ हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये अभिनय करत आहे. प्रियांकाने आतापर्यंत भोजपुरी चित्रपट 'बम बम बोल रहा है काशी', पंजाबी चित्रपट 'सर्वण' आणि आसामी चित्रपट 'पहुणा'मध्ये काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या भूमिकेविषयी खास माहिती....

बातम्या आणखी आहेत...