आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीला किस करताना पुष्कर जोगच्या पत्नीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, ठेवले असे युनिक नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  अभिनेता पुष्कर जोगच्या लहानगीचा पहिलाच फोटो समोर आला आहे. पुष्करच्या पत्नीने हा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. पु्ष्करच्या पत्नीने 19 डिसेंबर 2017 रोजी मुलीला जन्म दिला होता. विशेष म्हणजे या दोघांनी त्यांच्या चिमुकलीचे नावही वेगळेच ठेवले आहे. तिचे नाव आहे फेलिशा जोग. जास्मिनने फोटोसोबत तिच्या मुलीचे नावही सांगितले आहे आणि त्याचा अर्थही सांगितला आहे. फेलिशा या नावाचा अर्थ आहे जिच्यामुळे सर्वत्र आनंद पसरतो. 

 

पुष्कर जोगच्या पत्नीचे नाव जास्मिन ब्राम्हभट्ट आहे. पुष्करशी लग्न करण्याअगोदर जास्मिन एअर होस्टेस होती आणि एका फ्लाईटने प्रवास करत असताना जास्मिनला पाहून पुष्कर तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न थाटले.  २६ नोव्हेंबर २०१४ ला पुण्यात हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर तीन वर्षांनी पुष्कर आणि जास्मिन आईबाबा बनले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पुष्कर जोग आणि जास्मिनचे काही खास फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...