आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेलिशा आहे पुष्कर जोगच्या चिमुकलीचे नाव, बघा पत्नी-मुलीसोबतचे हे सुंदर Photoshoot

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात रंगलेल्या नाट्यात पुष्कर जोगचा गट विजयी ठरल्याने त्याला या आठवड्यात एक खास सरप्राईज मिळणार असल्याचं या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी त्याला सांगितलं होतं. आठवडा सुरू झाला आणि एकापाठोपाठ एक सगळ्याच स्पर्धकांसाठी सप्राईजेसची रांग लागली. पुष्कर मात्र आपल्या सप्राईजची वाट बघत असताना अखेर त्याची पत्नी जास्मिन या घरात आली आणि पुष्करचा चेहरा खुलला.

 

फेलिशा (पुष्करची मुलगी) च्या आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण बिग बॉसमुळे पुष्करच्या हातातून निसटले असले तरी याची भरपाई आपण तिघांनीही करण्याचं आश्वासन यावेळी जास्मिनने पुष्करला दिलं. त्याशिवाय आई, ती आणि फेलिशा अशा तिघींनाही पुष्करचा अभिमान असल्याचं तिने म्हटलं आहे.

 

फेलिशा खूप लहान असल्याने तिला बिग बॉसच्या घरात आणण्याची परवानगी नसल्याचं म्हणत जास्मिनने काही वेळासाठी ती गोष्ट टाळली तर काही क्षणांतच फेलिशाच्या बिग बॉसच्या घरातील प्रवाशाने पुष्करचा पहिला फादर्स डे अगदी धमाल साजरा झाला. आपल्या चार महिन्यांच्या चिमुरडीला सोडून बिग बॉसच्या घरात शिरलेला पुष्कर आपल्या छकुलीला दोन महिन्यांतर पाहून अतिशय भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. तर नावांतच आनंद दडलेल्या फेलिशाच्या प्रवेशाने बिग बॉसचं घर खऱ्या अर्थी आनंदून गेलं.

 

स्त्री दाक्षिण्याचं सतत समर्थन करण्यासाठी महेश मांजरेकरांकडून कौतुक होत असलेला पुष्कर, जास्मिन-फेलिशाच्या येण्याने भलताच आनंदला आहे. हा आनंद पुष्करला बिग बॉसच्या पुढील प्रवासात किती बळ देतो. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, पत्नी जास्मिन आणि मुलगी फेलिशासोबतचे पुष्करचे खास Photoshoot... 

बातम्या आणखी आहेत...