आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राजी’द्वारे 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणारी पहिली मराठी Actress ठरली अमृता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'राजी' चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘100 करोड क्लब’मध्ये एन्ट्री घेतली आहे आणि या चित्रपटामुळे 100 करोड क्लबमध्ये पोहोचलेल्या पहिल्या मराठी अभिनेत्रीचा मान अमृता खानविलकरने मिळवला आहे.

 

मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सिनेसृष्टीतल्या एका जाणकाराने अमृताच्या या यशाचं कौतुक   करताना म्हटलंय की, मराठी सिनेसृष्टीत नाव कमवून आपल्या बॉलीवूड करीयरच्या सुरूवातीच्या काळातल्या एका फिल्मला मिळालेलं हे घवघवीत यश अमृतासाठी नक्कीच महत्वाचे ठरेल. बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत माधुरी दीक्षित या मराठी आडनावाच्या फक्त एकाच अभिनेत्रीला 100 करोड कल्बचा हा पल्ला गाठता आलाय. पण माधुरी ही बॉलीवूड अॅक्ट्रेस म्हणूनच गणली जाते. त्यामुळे अमृता खानविलकर ही 100 कोटीच्या क्लबमध्ये पोहोचलेली पहिली मराठी अॅक्ट्रेस ठरली आहे.

 

‘राजी’च्या यशाने आनंदून गेलेली अमृता खानविलकर यावर प्रतिक्रिया देताना म्हणते, “सध्या माझा आनंद गगनात मावत नाही आहे. करण (जोहर) सर, मेघना(गुलजार) मॅम, आलिया विकी आणि युनिटमधल्या प्रत्येकाचीच मेहनत फळाला आलंय, असं मला वाटतं. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमासाठी मी त्यांची ऋणी आहे.”

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'राजी'च्या सेटवर विकी कौशल, आलिया भटसोबतचे अमृताचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...