आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly world:दीपिकाच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी 'राधा प्रेम रंगी रंगली'त राधाने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - निंबाळकर यांच्याकडे होळी आणि रंगपंचमी साजरी झाली खरी पण दीपिकाने तिची नवी खेळी खेळायला सुरुवात केली कारण, प्रेम राधामध्ये हळूहळू अडकत चालला आहे याची कल्पना दीपिका येऊ लागते. पण या रंगपंचमी नंतर प्रेमवर राधाच्या प्रेमाचा रंग चढणार का ? दीपिकाची खेळी तिच्यावरच उलटणार का ? राधाला दीपिकाचे खरे रूप काय आहे हे कळल्यावर तिने प्रेमवरच विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. राधा – प्रेम मध्ये हळूहळू फुलणाऱ्या या प्रेमाला दीपिकाची नजर तर लागणार नाही ? राधा आता खंबीरपणे प्रेमच्या बरोबर उभी आहे, हे कळल्यावर दीपिका आता कसं प्रेमला blackmail करेल ? प्रेम नक्की कुठला मार्ग स्वीकारेल हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे यात शंका नाही.

 

रंगपंचमीच्या दिवशी प्रेम आणि राधा मधील जवळीक बघून दीपिकाने ती गरोदर असल्याचे राधाला सांगितले. हे कळल्यावर राधाला धक्का बसला आणि राधा कोणलाही न सांगता घरा बाहेर निघून गेली. दीपिकाने राधाला काहीतरी नक्कीच सांगितले आहे याची शंका प्रेमला येते पण दीपिका ठामपणे सांगते कि तिने राधाला काहीही सांगितले नाही. सगळे घरामध्ये अस्वस्थ असतानाच राधा घरी परतते. राधा मध्ये काहीतरी बदल झाला आहे असे प्रेमला वाटते. राधा प्रेमला अनपेक्षित प्रश्न विचारते, ज्यामुळे प्रेम पूर्णत: गोंधळून जातो. राधा प्रेमला त्याचं दीपिकावर प्रेम आहे का?  असं विचारते आणि प्रेमला त्याला नकार देतो, पण राधावर प्रेम आहे कि नाही हे अजून कळत नाही अस म्हंटल्यावर राधाला तिचे उत्तर मिळले अस राधा प्रेमला सांगते. परंतु प्रेम तिला आवडू लागले आहेत असं ती प्रेमला सांगते आणि प्रेमकडून वचन घेते कि, प्रेम कधीही राधाला सोडून जाणार नाही. प्रेमचा हा अबोलाच राधाला सगळी उत्तरं देऊन जातो.

 

दीपिकाचं खर रूप कळल्यानंतर राधा पहिल्यांदा प्रेमच्या बाजूने उभी रहाणार आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये दीपिकाचे स्वार्थी प्रेम जिंकणार कि राधाचा विश्वास हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...