आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिकाने \'या\' स्टारकिडशी थेट घेतला पंगा, म्हटली \'जीमपेक्षा अॅक्टींग क्लासेस जॉईन करण्याची जास्त गरज\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राधिका आपटे नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा नवीन विधान देऊन राधिकाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राधिकाने नुकतेच अभिनेत्री नेहा धुपियाच्या शोमध्ये राजकुमार रावसोबत हजेरी लावली होती यावेळी नेहा धुपियाने विचारलेल्या प्रश्नांना राधिकाने बिनधास्त उत्तरे दिली. राधिकाने यावेळी स्टारकिड सूरज पांचोलीला जीमपेक्षा अभिनयाचे क्लासेस घेण्याची गरज असल्याचे सांगितले तसेच सुशांत सिंग राजपुत याला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे असे सांगितले. 

 

या शोमध्ये राधिकासोबत राजकुमार रावनेही उपस्थिती लावली होती. राधिका नीडरपणे सर्व प्रश्नांची उत्तरे देत होती तर राजकुमार प्रत्येक प्रश्न विचारताना सावधगिरी बाळगत होता. त्याला वाटेल आणि तितकेच तो बोलत होता. यामुळे त्याने कुठलेही वादग्रस्त वक्तव्य न करता सावधगिरीने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. 

 

राजकुमार राव लवकरच 'फन्ने खां' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय- बच्चन आणि अनिल कपूरही असणार आहेत. तर राधिकाचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमात राधिकाने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा धुपियाच्या शोदरम्यानचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...