आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रकिनारी गेल्यावर आता काय साडी नेसावी का? राधिका आपटेने केला ट्रोलर्सला प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमीच हटके अभिनय आणि भूमिका करुन आपला वेगळा अशा प्रेक्षकवर्ग तयार करणारी राधिका आपटे तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यांनी चर्चेत असते. राधिका सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे आणि तिच्या फॅन्ससाठी नेहमीच तिचे फोटो त्यावर शेअर करत असते. राधिकाने समुद्रकिनारी निवांत क्षण घालवतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर तिला ट्रोल करण्यासाठी नेटकरी पुढे सरसावले. 

 

राधिकाला ट्रोल करण्याचे एकमेव कारण होते ते म्हणजे तिने घातलेली बिकीनी. समुद्रकिनारी बसलेल्या या फोटोमध्ये राधिकाला तिने बिकीनी घातल्याबद्दल ट्रोल केले जात होते. पण नेहमीप्रमाणेच राधिकाने तिच्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. राधिकाने सांगितले की तो फोटो ट्रोल होत आहे याबद्दल मला माहितीही नव्हे मला कुठुनतरी कळाले आणि मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की समुद्रकिनारी गेल्यावर काय बिकीनीऐवजी साडी घालावी अशी लोकांची इच्छा आहे का? 

 

राधिका आपटेचा नुकताच पॅडमॅन हा चित्रपट रिलीज झाला आणि त्यात एका ग्रामीण स्त्रीची भूमिका करणाऱ्या राधिकाच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, राधिका आपटेचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो..

बातम्या आणखी आहेत...