आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनस्क्रिन टॉपलेस, बिकीनी सीन द्यायला घाबरत नाही राधिका, ब्रिटीश तरुणासोबत थाटला आहे संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री राधिका आपटे येत्या 9 फेब्रुवारी रोजी 'पॅडमॅन' या चित्रपटाद्वारे आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राधिकाने एकदम सर्वसाधारण घरातील स्त्रीची भूमिका केली आहे. अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका वाट्याला आल्याने राधिका सध्या आनंदात आहे. चित्रपटात जेवढी सर्वसाधारण तेवढीच खऱ्या आयुष्यात राधिका बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. पुण्यात जन्मलेल्या मराठमोळ्या राधिकाचे बालपण आणि शिक्षण याच शहरात झाले आहे.

 

राधिकाने 2005 मध्ये 'वाह! लाइफ हो तो ऐसी' या सिनेमाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत राधिकाने सहा वेगवेगळ्या भाषांत 33 सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या बोल्ड अंदाजाने राधिकाने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी इमेज तयार केली आहे. इतकेच नाही, तर अनेक वादांतही तिचे नाव अडकले आहे.

 

बोल्ड सीन लीक झाल्याने आली चर्चेत...
राधिकाने 'पार्च्ड' या सिनेमात एका गावातील महिलेची भूमिका केली आहे. या भूमिकेसाठी राधिकाचे फार कौतुक झाले आणि त्यातील गरमागरम दृश्यांची तेवढीच चर्चा झाली. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच हे सीन लीक झाले होते आणि ते पॉर्न म्हणून विकलेही जात होते. या चित्रपटातील एका दृश्यात राधिकाने टॉपलेस सीन दिला होता. 

 

मुळची पुण्याची आहे राधिका..
7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेल्या राधिकाने येथील फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आहे. ती पुण्याच्या प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चारु आपटे यांची मुलगी आहे. तिचे आईवडील याच शहरात वास्तव्याला आहेत. राधिका सुटीच्या काळात नेहमी पुण्यात येत असते. बालपणीपासूनच तिला अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुण्यातील आसक्त या मराठी नाट्यसंस्थेत एन्ट्री घेतली. पूर्ण विराम, मात्र-रात्र आणि कन्यादान या मराठी नाटकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या. 'अंतहीन' या बंगाली सिनेमा राधिकाने वृंदा नावाचे पात्र साकारले होते. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

 

कथ्थक नृत्यांगणा आहे राधिका
'शोर इन द सिटी' हा हिंदी सिनेमा रिलीज झाल्यानंतर राधिका कंटेम्परेरी डान्स फॉर्म शिकण्यासाठी वर्षभर लंडनला होती. याविषयी एका मुलाखतीत तिने सांगितले होते, नृत्याची आवड असल्याने लंडनमध्ये असताना बाराबार तास ती नृत्याचा सराव करायची.

 

ब्रिटीश बॉयफ्रेंडसोबत थाटले लग्न
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश बॉयफ्रेंड बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले. बेनेडिक्ट लंडनस्थित म्युजिशिअन आहे. लंडनमध्ये असताना राधिका आणि बेनेडिक्टची भेट झाली, पुढे त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि लग्नात झाले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, राधिकाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...