आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या मासिकपाळीचा राधिकाचा असा होता अनुभव, आईने दिली होती जंगी पार्टी आणि गिफ्टससुद्धा !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राधिका आपटे ही एक अशी अभिनेत्री आहे जी कधीही कोणत्याही विषयावर कचरत नाही आणि स्पष्टपणे तिचे मत मांडते. मग ती पर्सनल लाईफ असो अथवा प्रोफेशनल राधिका नेहमीच सडेतोड उत्तरासाठी तयार असते. राधिकाने नुकताच तिच्या पर्सनल लाईफबद्दल काही खुलासे केले आहेत. राधिका आता आगामी चित्रपट पॅडमॅनमधून झळकणार आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. राधिकाने तिच्या मासिक पाळीबद्दल ही खास माहिती दिली आहे. आईने दिली होती पार्टी आणि गिफ्टही...

 

आईने दिली होती पार्टी आणि गिफ्टही...
राधिका आपटेने सांगितले की, माझे आईवडिल डॉक्टर आहेत त्यामुळे साहजिकच मला माझ्यासोबत हे सर्व घडणार हे माहीत होते. जेव्हा माझ्या मासिक पाळीला सुरुवात झाली त्यादिवशी आईने माझ्यासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. आईने मला गिफ्ट म्हणून घड्याळ दिले होते. मी त्यावेळी फार रडत होती पण इतरांकडूनही मला खूप गिफ्टस मिळाले होते.

राधिका लवकरच महिलांची एक महत्त्वाची समस्या मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकीनबद्दल भाष्य करणाऱ्या पॅडमॅन या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या पद्म अवॉर्डी अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या बायोपिकवर बनवण्यात आला आहे. यात अक्षय कुमार सोशल वर्करची भूमिका करत आहे. राधिका आपटे या चित्रपटात अक्षय कुमारची पत्नी बनलेली आहे. पॅडमॅन या चित्रपटात सोनम कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

 

पॅडमॅन चित्रपट आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केला आहे. आपल्यासाठी खास पॅडमॅनच्या सेटवरील राधिकाचे फोटोज् घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, राधिका आपटेच्या 'पॅडमॅन' चित्रपटाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...