आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Rajesh Shringarpore And Resham Tipnis Troll On Social Media रेशम राजेश असं वागणं बरं नव्हे... सोशल मीडियावर उठली दोघांवर टीकेची झोड

#BBmarathi: रेशम-राजेश असं वागणं बरं नव्हे... सोशल मीडियावर उठली दोघांवर टीकेची झोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना रेशम टिपनिस आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्यात जवळीक वाढल्याचे बघायला मिळत आहे. आठवडाभरानंतर सिक्रेट रुममधून बिग बॉसच्या घरात परतलेला राजेश रेशमच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसत आहे. दोघांनी शोच्या माध्यमातून एकमेकांवरच्या प्रेमाची जाहिररित्या कुबुलीदेखील दिली. इतकेच नाही तर राजेश आणि रेशम गेल्या दोन दिवसांपासून एकच बेड आणि ब्लँकेट शेअर करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये मैत्रीपलिकडील नाते तयार झाले, असे म्हटले तर वावगे ठरु नये. पण या दोघांच्या नात्यावर जरी घरात सई-मेघा-उषा-पुष्कर यांच्यात चर्चा रंगतेय. तशीच घराबाहेरदेखील प्रेक्षकांमध्ये या दोघांचे नाते चर्चेचा विषय ठरले आहे. सोशल मीडियावर तर दोघांवर टीकेची झोडच उठली आहे. 


ख-या आयुष्यात राजेश विवाहित असून डिंपल श्रृंगारपुरे हे त्याच्या पत्नीचे नाव आहे. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. तर रेशम घटस्फोटित आहे. अभिनेता संजीव सेठसोबत तिचे लग्न झाले होते. या लग्नापासून तिला रिशिका ही एक मुलगी आणि मानव हा एक मुलगी आहे. त्यामुळे विवाहित राजेशचे घरात रेशमसोबत सुरु असलेले चाळे प्रेक्षकांना रुजताना दिसत नाहीयेत. सोशल मीडियावर biggbossmarathi.trolls या नावाने एक पेज तयार झाले असून यावर प्रेक्षकांच्या संतापजनक प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत. 


सोशल मीडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रिया... 
- biggbossmarathi.trolls या पेजवर राजेशची पत्नी डिंपलसाठी एक मेसेज देण्यात आला आहे. त्यानुसार, तू बिग बॉसच्या घरात जाऊन नव-याच्या थोबाडीत लगाव, किंवा त्याला घटस्फोटाचे पेपर तरी पाठव! असे म्हटले गेले आहे.  
- sab.nk_ नावाच्या युजरने म्हटल्याप्रमाणे, प्लीज मॅम थिस इज सो चीप, नाही बघवत मराठीत हे सर्व नॅशनल टेलिव्हिजनवर होताना...  
- adi.boy2018 नावाच्या युजरने लिहिले, Cheapest stuff. ह्यांना अजून काहीच करता येत नाही.  
- leena_bokphode नावाच्या युजरने लिहिले, हा फॅमिली शो आहे. 
- radhikapotnis नावाची युजर लिहिले, राजेशला घराबाहेर पाठवलं पाहिजे होतं. टीआरपीसाठी ह्यांचा रोमान्स दाखवणार म्हणूनच आणलं त्याला इथे...   - abhinav__turkhade नावाच्या युजरने तर जोपर्यंत राजेश घरात आहे, तोपर्यंत बिग बॉस बॉयकॉट केल्याचं म्हटलंय.  


पुढील स्लाईड्सवर बघा, बिग बॉस मराठीच्या घरातील राजेश-रेशम यांची जवळीक दाखवणारे फोटोज आणि सोबतच वाचा सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रिया... 

 

बातम्या आणखी आहेत...