आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBDay7:रेशम-राजेश यांचा बिग बॉस घरात बहरला रोमान्स, इतर सदस्यांची कुजबुज सुरु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - बिग बॉस मराठी घरात सध्या रेशम टीपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वीपासूनच राजेश आणि रेशम एकमेकांच्या जास्त जवळ झाले आहेत आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. घरातील इतर सदस्य त्यांच्या रिलेशनशीपबद्दल चर्चा करत आहेत. हातात हात घेऊन असतात रेशम-राजेश..

राजेश आणि रेशम हे दोघे एकमेकांसोबत घरात नेहमीच एकत्र दिसतात. घरातील कोणते टास्क असो अथवा निवांत क्षणाच्या गप्पा, नेहमीच हे दोघे सोबत असतात. त्यांच्या अशा वागण्यामुळे घरातील काही सदस्य त्यांच्या वागणुकीवर चर्चा करताना दिसतात.

 

उषा नाडकर्णी यांनी ओढले ताशेरे..
उषा नाडकर्णी, पुष्कर जोग, मेधा धाडे यांनी गप्पा मारत असताना रेशम-राजेश यांच्या वागणुकीबद्दल टीका केली. राजेश विवाहीत असूनही त्याचे रेशमबरोबर वागणे बरोबर नाही तर रेशम इंडस्ट्रीत फक्त काम मिळवण्यासाठी अशा प्रकारे वागते आहे असेही उषा नाडकर्णी म्हणाल्या. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेशम-राजेशचे काही खास फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...