आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' घटनेच्या आठवणीने राखी सावंतने पिली अर्धा बॉटल व्होडका, किसींग सीनसाठी घेतले 55 रिटेक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी धडपड करणारी अभिनेत्री कोण, असा सवाल विचारला तर अर्थातच ते नाव आहे राखी सावंत. राखी काही ना काही कारणाने मग ते वादग्रस्त विधान असू दे अथवा चित्रपट असू दे नेहमीत चर्चेचे कारण बनते. राखी सावंत सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि प्रथमच कोणत्या चित्रपटात ती किसींग सीन देत आहे. या सीनच्या चित्रीकरणादरम्यान राखीने तब्बल 55 रिटेक दिले. केवळ रिटेकच नाही तर हा सीन करताना तिने अर्धा बाटली व्होडकाही पिल्याचे सांगितले आहे. काय आहे व्होडका पिण्याचे कारण..

 

 राखी सावंतने व्होडका पिण्यामागे तिचा भूतकाळ असल्याचे सांगितले आहे. राखी म्हणते की, "मी कधीही चित्रपटात किसींग सीन दिला नाही त्यामुळे यासाठी मी अगोदर तयार नव्हते. दिग्दर्शकांनी विनंतीवरुन मी सीन देण्यास तयार झाली पण चित्रीकरण करताना मला मिका सिंगसोबतच्या त्या आठवणी डोक्यातून जायला तयार नव्हत्या. तो प्रसंग आठवल्याने माझ्यावर कोणीतरी बळजबरी करत आहे किंवा जबरदस्ती करत आहे असेच वाटत होते. मिका सिंग माझ्याशी कशाप्रकारे वागला मला तेच सारखे जाणवत होते. त्या आठवणी विसरण्यासाठी मी व्होडकाचा आधार घेतला." 
 
 काही वर्षांपूर्वी मिका सिंगने त्याच्या बर्थ डे पार्टीत राखी सावंतला सर्वांदेखत किस केले होते यावेळी राखीने मिकाने तिला जबरदस्ती किस केले असा आरोप केला होता. राखी सावंत-मिका सिंग हे प्रकरण नंतरही चांगलेच गाजले होते. राखी सावंत सध्या तिच्या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे आणि नुकताच तिने व्हॅलेंटाईन डे साठी पार्टनरच्या शोधात असल्याचेही सांगितले आहे. 

 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, राखी सावंतचे आणि मिका सिंगचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...