आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठीत झाली या बोल्ड अभिनेत्रीची एंट्री, बिकिनीमध्ये केले फोटोशूट, स्वप्निल जोशीसोबत करणार डेब्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेसृष्टीत एका नव्या नायिकेचे आगमन झाले आहे. रणांगण या चित्रपटातून एक नवीन चेहरा मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तो चेहरा आहे प्रणाली घोगरे हीचा. मुळची मराठी असलेली प्रणालीने तिच्या करिअरची सुरुवात हिंदी मालिकेतून केली. प्रथमच मराठी चित्रपटात केले आहे काम...

 

प्रणालीने तिच्या करिअरची सुरुवात राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘मेरे रंग में रंगनेवाली’या मालिकेतून केले आहे. यानंतर त्यांनी राधा अॅण्ड एलडी या मालिकेतही काम केले. तसेच तिने  निखिल अडवानींच्या 'गुड्डू इंजिनीयर' या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. केवळ हिंदीतच नाही तर तेलुगुतही प्रणालीने 'मंचुकुरीसी वेल्लालो' या चित्रपटात काम केले आहे. आता प्रथमच प्रणाली मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सोशल मीडियावरही प्रणाली फार अॅक्टीव्ह आहे आणि तिचे अनेक ग्लॅमरस फोटोज् ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. 

 

प्रणालीने एका मुलाखतीत तिच्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. त्यात तिने सांगितले की, लहानपणी अतिशय टॉमबॉईश असलेल्या तिला क्रिकेटची फार आवड होती आणि त्यामुळेच कधी मुलींसारखे नटण्या-मुरडण्याकडे तिचे लक्ष नव्हते. तसेच तिला स्वयंपाकाचीही फारशी आवड नाही पण फुडी असल्यामुळे सर्वात जास्त पैसे ती खाण्यावरच खर्च करते असे तिने सांगितले. 

 

सचिन पिळगावक, स्वप्नील जोशी यांसारख्या कलाकारांसोबत मराठीत पदार्पण करत असल्याने फार खुशीत असल्याचे प्रणाली सांगते. प्रणालीचा रणांगण हा सिनेमा 11 मे रोजी    हिंदीतून मराठीत आलेली प्रणालीचा आता मराठीतील परफॉर्मन्स पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रणाली घोगरेचे काही ग्लॅमरस फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...