आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असा पार पडला 'रणांगण' चित्रपटाचा ट्रेलर लाँच, स्वप्निल जोशीसह इतर टीमचीही उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या 'रणांगण' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या सोहळ्याला निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदार बरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंगबरोबरच संगीतातील दिग्गज अवधूत गुप्ते, राहुल रानडे, गुरू ठाकूर आणि कलाकार सचिन पिळगांवकर, प्रणाली घोगरे, आनंद इंगळे ही कलाकार मंडळी उपस्थित होती. नुकताच लाँच झालेल्या या ट्रेलरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारां च्याबरोबरीने दिसलेले संजय नार्वेकर, मुक्ता बर्वे हे चेहरे... यांची भूमिका नेमकी काय असणार हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणार आहेच मात्र चित्रपटाच्या ट्रेलरवरून एक सुंदर, मनोरंजनात्मक चित्रीकरण रणांगणच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार, एवढं नक्की.

 

या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिला आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली
आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत. आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...