आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळी अभिनेत्री ललिता पवार यांच्या डोळ्यांवर केली गेली अभद्र टीपण्णी, ट्रेलर पाहून भडकला हा खलनायक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानीची निर्मिती असलेला चित्रपट 'दिल जंगली' लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नु आणि साकिब सलीम लीडरोलमध्ये दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील एका सीनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार यांच्या व्यंगावर टीपण्णी करण्यात आली आहे. यात एक अॅक्टर त्याच्या को-अॅक्टरला विचारत आहे, 'दिल से आपको कहना चाहता हूं, आप न वो एक्ट्रेस जैसी लगती हो बिल्कुल', ती अभिनेत्री म्हणते, 'जे लो (जेनिफर लोपेज)?' त्यावर तो अभिनेता म्हणतो, 'न न न न, ललिता पवार ... कांणी!' हे ट्रेलर पाहून प्रसिद्ध खलनायक रंजित यांचे पित्त खवळले आहे.

 

- रंजीत यांनी ललिता पवार यांच्यावर झालेल्या या टीपण्णीचा विरोध करताना म्हटले की, "हे जे कोणी लिहीले आहे त्यांना पकडायला पाहिजे. आजकल लोकांना काहीही बोलण्याची सवय लागलेली आहे. ललिताजी यांच्यासारख्या महान कलाकारांचा सन्मान करायला हवा. मी याची निंदा करतो. "
- "चित्रपटात कोणाला वाईट म्हटल्यावर चित्रपट चालत नाही. इंडस्ट्रीतील नामवंत घरातील लोकांकडून जर अशी चूक होत असेल तर हे चुकीचे आहे.  चित्रपटाचा दर्जा इतका खालावला आहे की आता काम करायलाही लाज वाटते."


- रंजीत म्हणाले की, "मला आतापर्यंत चित्रपटात कोणी शिवी द्यायला जरी लावली तरीही मी कधीच ती देत नाही. अगोदरचे प्रोड्युसर-दिग्दर्शक या गोष्टींची फार काळजी घ्यायचे. 
- जर कोणावर टीका करायचीच असेल कर मी ते डोळ्यांनी करेल. शिवी देऊ शकत नाही. ललिता यांच्या डोळ्यांच्या व्यंगानवर टिपण्णी करण्यापेक्षा त्यांनी चित्रपटात केलेलेल दमदार अभिनय पाहायला हवा आणि त्यातून काही शिकायला हवे. सेन्सॉर बोर्डही अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही हेही विशेष आहे.'"

 

 ना चित्रपटाची टीम अथवा सेन्सॉर बोर्डानेही दिली नाही प्रतिक्रिया...

- विशेष म्हणजे, कांणी हा एक असा अभद्र शब्द आहे जो एका डोळ्याने दृष्टीहीन असलेल्या व्यक्तीसाठी वापरला जातो. 
- एका ज्येष्ठ अभिनेत्रीसाठी अशाप्रकारे शबद् वापरण्याचे कारण काय जेव्हा हे जाणण्यासाठी निर्माता जॅकी भगनानी आणि दिपशिखा देशमुखला संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सेन्सॉर बोर्ड प्रमुख प्रसून जोशी यांच्याशिही संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हाही त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.

 

700 हून जास्त चित्रपटात केले आहे काम..
मुक चित्रपटाच्या काळापासून  1943 साली आलेल्या टॉकी सिनेमाच्या काळातही सक्रिय राहणाऱ्या ललिता पवार यांनी रामायणाची मंथरासह अनेक चित्रपटात अभिनेत्री ते खलनायिका अशा भूमिका केल्या. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, ललिता पवार यांचे काही खास PHOTOS.........

बातम्या आणखी आहेत...