आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीच्या लाडक्या \'शनाया\'ला मिळाला हा पुरस्कार, फोटो शेअर करुन व्यक्त केला आनंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनाया म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री रसिका सुनीलला युवा चित्र पदार्पण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. रसिकाने या पुरस्काराचा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबतच तिने कॅप्शन दिले आहे, First is always special..

 

रसिकाला 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 

 

रसिकाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असल्याने तो फार स्पेशल असल्याचे ती सांगते. रसिकाचे 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील काम जरी खलनायिकेचे असले तरी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रसिका सुनीलचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...