आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का, मराठी इंडस्ट्रीतील एकमेकांच्या सख्ख्या बहिणी आहेत या काही अभिनेत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - आज मराठीतील विनोदी अभिनेत्री सुप्रिया पाठारे त्यांचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या सुप्रिया यांचा जन्म एका साधारण मराठी कुटुंबात मुंबईत झाला. लहानपणापासूनच सुप्रिया यांना अभ्यासात रुची नसल्याने त्यांचा ओढा अभिनयाकडे वळला आणि शाळेत असतानाच त्यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली. ‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर सध्याच जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती.

फार कमी जणांना माहिती आहे ही सुप्रिया पाठारे आणि अभिनेत्री अर्चना नेवरेकर या दोघी सख्ख्या बहिणी आहेत.सुप्रिया यांनी कधी विनोदीशैलीने तर कधी खलनायिका रंगवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे तर अर्चना नेवरेकर या बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीतून दूर आहेत. अर्चना या सुप्रिया यांच्या मोठ्या बहीण आहेत. 

 

आज सुप्रिया यांच्या वाढदिवसानिमित् तुमच्यासाठी खास मराठी इंडस्ट्रीतील सख्ख्या बहिणींच्या जोड्या घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी इंडस्ट्रीतील या सख्ख्या बहिणींच्या जोड्या...

बातम्या आणखी आहेत...