आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या अचानक जाण्याने शॉकमध्ये होती रिमा यांची मुलगी मृण्मयी, अशी होती आई-मुलीची बाँडींग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'बॉलिवूडची माँ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रिमा लागू यांची कन्या मृण्मयी लागू 'नामकरण' या मालिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे 'नामकरण' या मालिकेत काम करत असतानाच रिमा यांचा मृत्यू झाला होता पण आता त्यांचीच सावली पुन्हा मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मृण्यमी निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. आईच्या मृत्यूने बसला होता जबर धक्का..
 
रिमा लागू यांचा 18 मे 2017 रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या सर्वात जास्त जवळ असलेल्या मृण्मयीला याचा जबर धक्का बसला होता. तिने यावेळी सांगितले होते की, "गेले कित्येक दिवस मी आईशी वेळ नसल्यामुळे नीट बोलले नव्हते. मी फार लवकर आईला गमवले. तिचे असे अचानक मला सोडून निघून जाणे माझ्यासाठी फार शॉक आहे." 
 
आईशी होते मैत्रिणीप्रमाणे नाते..
 - मृण्मयीने सांगितले की, "माझी आई माझी बेस्ट फ्रेंड होती. मी कधीच विचार केला नव्हता की मी आईला इतक्या लवकर गमवेल. तिची कमी माझ्या आयुष्यात कोणीच पूर्ण करु शकत नाही." 
 - "मी देवाकडे फक्त इतकेच मागेल की तिच्या आत्म्याला शांती मिळो आणि माझ्या आईला या जन्मापेक्षा जास्त प्रसिद्धी तिच्या पुढच्या जन्मात मिळू दे." 
 - 18 मे 2017 रोजी रिमा यांना कोकीळाबेन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा तिथे सकाळी 3 वाजून 15 मिनीटांनी मृत्यू झाला होता. 

 

विवाहीत आहे मृण्मयी..
- मृण्मयीने असिस्टंट डायरेक्टर विनय वैकुलसोबतच लग्न केले आहे. त्यांनी साली लग्न केले.
- मृण्मयीने इंडस्ट्रीमध्ये  'दंगल'(2016), 'पीके'(2014) और 'गुलाब गैंग'(2014) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मृण्मयी लागू-वैकुलचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...