आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Remembrance Marathi Actress Reema Lagoo First Death Anniversary आता उरल्या आहेत फक्त आठवणी, असा होता रिमा लागू यांचा जीवनप्रवास

Remembrance: आता उरल्या आहेत फक्त आठवणी, असा होता रिमा लागू यांचा जीवनप्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 18 मे 2017 रोजी हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले होते. त्यांची कन्या मृण्मयी लागू हिने त्यांना मुखाग्नी दिला होता. रिमा लागू यांची अभिनय क्षेत्रातील कारकिर्द 50 वर्षांहून अधिक मोठी होती. यामध्ये नाटकापासून सुरू झालेल्या त्यांचा प्रवास हिंदी, मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांद्वारे अगदी घराघरापर्यंत पोहोचला होता. बॉलिवूडमध्ये आईची भूमिका रंगवणाऱ्या मोजक्या अशा आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये रिमा लागू यांचे नाव घेतले जाते. रिमा लागू आज आपल्यात नाहीत, पण त्या त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांमध्ये राहतील. 

 

पुढील स्लाईड्सवर बघुयात, रिमा लागू यांची आठवणीतील छायाचित्रे आणि जाणून घेऊयात त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...

बातम्या आणखी आहेत...