आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBM:राजेश नव्हे, स्वतःपेक्षा 5 वर्षांनी लहान या व्यक्तीच्या प्रेमात आहे रेशम, प्रेमाने म्हणते \'मब्स\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस मराठीच्या घरात अलीकडेच सदस्यांना भेटायला त्यांचे कुटुंबीय आले होते. बिग बॉस यांनी कुटुंबातील दोन व्यक्तींना घरातील सदस्यांना भेटायला परवानगी दिली होती. पण रेशम टिपनिसला भेटायला फक्त तिची लेक रिशिका आली होती. तब्बल दोन महिन्यांनी मुलीला भेटल्याने रेशमला अश्रू अनावर झाले होते. रेशमचा मुलगा मानव काही कारणास्तव तिला भेटायला येऊ शकला नाही.

 

बॉयफ्रेंडला केले रेशमने मिस...

रिशिका घरातून निघून गेल्यानंतर रेशम आस्तादसोबत गप्पा मारत होती. त्यावेळी कॅमे-याकडे बघून रेशमने तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीचा उल्लेख केला. रेशमने ज्या व्यक्तीचा उल्लेख केला, त्या व्यक्तीचे नाव आहे संदेश किर्तीकर. संदेशसोबत रेशम रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिच्या बोलण्यावरुन समजले. रिशिका जेव्हा रेशमला भेटायला आली होती, तेव्हा तिने संदेश तिला मिस करत असल्याचा निरोप दिला होता. कॅमे-याकडे बघून रेशमने संदेशला तुझा निरोप मिळाला असून मी सुद्धा तुला खूप मिस करत असल्याचे त्याला सांगितले. 

 

प्रेमाने संदेशला मब्स म्हणते रेशम...

बिग बॉसच्या घरात रेशम संदेशला मिस करताना दिसली. रिशिकासोबत तू का आला नाहीस, अशी लाडीक तक्रार कॅमे-यावर रेशम संदेशकडे करताना दिसली. इतकेच नाही तर बिग बॉस प्लीज संदेशला पाठवा ना... अशी विनंतीदेखील तिने बिग बॉस यांच्याकडे केली. रेशमने संदेशला प्रेमाने मब्स म्हणून हाक मारते.  

 

रेशमपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे संदेश... 

आस्तादने रेशमला संदेश किती वर्षांचा आहे, असा प्रश्न केला. त्यावर तो पाच वर्षांनी लहान असल्याचे, रेशमने सांगितले. रेशम 42 वर्षांची तर संदेश 38 वर्षांचा आहे.

  

 

राजेशच्या प्रेमात असल्याचे केले नाटक?

खरं तर बिग बॉस मराठीच्या घरात रेशमची राजेश श्रृंगारपुरेसोबत जवळीक वाढल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. घरात त्यांनी एक बेडदेखील शेअर केला. राजेशने तर कॅमे-यावर तो रेशमच्या प्रेमात पडल्याची कबुलीदेखील केली. रेशमवरच्या प्रेमाचे जाहिर प्रदर्शन केल्याने राजेशला या खेळातून बाहेर पडावे लागले. आता रेशमने तिच्या खासगी आयुष्यातील सर्वात स्पेशल व्यक्ती असलेल्या संदेशचा उल्लेख याच शोमध्ये केला आहे. यावरुन राजेशसोबतची जवळीक खेळातील केवळ एक स्ट्रॅटेजी तर नव्हती ना... असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.  

 

संदेश किर्तीकरसोबतचे अनेक फोटोज रेशमच्या सोशल मीडिया अकाउंटवर बघायला मिळतात. पाहुयात, दोघांचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...