आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिनेत्री रेशम टीपणीसची कबुली, 'धक धक गर्ल'मध्ये सापडली नवी मैत्रीण, पाहा सेटवरील मौजमस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री रेशम टीपणीस सध्या फार कमी मराठी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या समोर येते. माधुरी दीक्षितचा आगामी आणि प्रथमच मराठी सिनेमा 'बकेटलिस्ट'मध्ये रेशम टीपणीसही भूमिका करणार असल्याने तिचे चाहते आनंदात आहेत. रेशमने इन्सटाग्रामवर माधुरीसोबत काही फोटो शेअर केले आहे त्यात तीने माधुरीच्या रुपात तिला एक जवळची मैत्रीण भेटल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीमने पुण्याचे शूटिंग नुकतेच संपविले आहे. 

 

अभिनेत्री रेशम टीपणीसने अनेक हिंदी तसेच मराठी प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. रेशमने 1992 साली आलेल्या बाजीगर या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. त्यानंतर रेशमने प्रामुख्याने टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये काम केले. त्यात 'दो दिल एक जान', 'सतरंगी ससुराल' यांसारख्या मालिकांचा समावेळ आहे. मराठीतील प्रोजेक्ट अन तोसुद्धा 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितसोबत असल्याने रेशम सध्या खुशीत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेशम टीपणीस आणि माधुरी दीक्षितचे 'बकेटलिस्ट' ऑन लोकेशन फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...