आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: रिंकूसह या अभिनेत्री अवतरल्या \'चला हवा येऊ द्या\'च्या मंचावर, रंगणार सौंदर्य स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरु, डॉ. निलेश साबळे, स्पृहा जोशी आणि तेजस्विनी पंडीत. - Divya Marathi
प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरु, डॉ. निलेश साबळे, स्पृहा जोशी आणि तेजस्विनी पंडीत.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

 

थुकरटवाडीत रंगणार आहे आता सौंदर्य स्पर्धा, पोहचल्या 4 मराठी अभिनेत्री...

'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागात थुकरट वाडीत मिच् थुकरटवाडी २०१८ सौंदर्य स्पर्धा रंगणार आहे आणि या 'मिच् थुकरटवाडी'मध्ये सहभागी होणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, प्रार्थना बेहरे आणि रिंकू राजगुरू. निलेश आणि भाऊ कदम यांनी या सर्व अभिनेत्रींना जाऊन मिच् थुकरट वाडीचा किताब दिला आहे, खरा पण यातली नक्की मिच् थुकरट कोण असणार? हे 25 जून आणि 26 जूनला समजेल.

 

पुढील स्लाईड्सवर बघा,  'मिच् थुकरटवाडी' या सौंदर्य स्पर्धेची छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...