आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश देशमुख म्हणतो, \'मी एकमेव अयशस्वी बँकचोर\', अपयशावर स्वतःच केला विनोद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीरव मोदी बँक घोटाळा प्रकरणाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. गेले कित्येक वर्षापासून चाललेल्या या घोटाळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीही अडकले आहेत. हे प्रकरण जितके गंभीर आहे तितकीच त्याबद्दल विनोदही होतांना दिसत आहेत. जनता सोशल मीडीयावर या प्रकरणाच्या वाभाड्या काढत आहेत. कोणी व्यंगचित्राच्या माध्यमातून तर कोणी मीम्सद्वारे उपरोधिक टीका नीरव मोदी आणि सरकारवर करत आहे. सोशल मीडियावर आता या ट्रोलिंगमध्ये अभिनेता रितेश देशमुखनेही उडी घेतली आहे.

 

रितेश देशमुखने तो एकटा बँकचोर असूनही अयशस्वी झाला असे त्याने म्हटले आहे. रितेशने हे ट्वीट केले आणि लोकांना त्याची विनोदबुद्धी फारच आवडली. रितेशने स्वतःला 'बँकचोर' म्हटले कारण 2017 साली त्याचा बँकचोर हा सिनेमा आला होता आणि तो तिकीटबारीवर साफ आपटला होता. हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला ते कळालेच नाही. रितेशने अपयशावरही केलेल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना चांगलीच मजा आली.

बातम्या आणखी आहेत...