आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्दर्शक वामन केंद्रेंच्या मुलाचा नवा चित्रपट 'सरगम', गिरीश कर्नाडसह या स्टार्ससोबत केलं काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध दिग्दर्शक वामन केंद्र यांचा मुलगा ऋत्विक केंद्र आता 'सरगम' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  ऋत्विकने आपल्या फेसबुक पेजवरुन या सिनेमाचं ऑफिशल पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात ऋत्विक मुख्य भूमिकेत आहे. पण त्याची चित्रपटातील भूमिका अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पोस्टरवर ऋत्विकच्या हातात कॅमेरा दिसतं असून दुसऱ्या पोस्टरवर ऋत्विक कॅमेऱ्याच्या मागे आपल्याला दिसतो आहे. ऋत्विक या सिनेमात नेमका कोणत्या भूमिकेत दिसतो याची उत्सुक्ता सर्वांनाच लागून राहिली आहे. या चित्रपटात गिरीश कर्नाड आणि यतिन कार्येकर या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी ऋत्विकला मिळाली आहे. 


या मालिकेतून घराघरांत पोहोचला आहे ऋत्विक... 
"मानसीचा चित्रकार तो" या मालिकेतून ऋत्विकने मराठी नाट्यसृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं नाव निर्माण केलं आहे. ऋत्विकचं 'मोहे पिया' हे हिंदी नाटकदेखील गाजत आहे. 


पाहुयात, ऋत्विकच्या 'सरगम'चे पोस्टर्स...

बातम्या आणखी आहेत...