आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:रोहीत राऊतने गर्लफ्रेंड जुईलीला असे केले रोमँटीक विश, म्हटला 'तुच दिलीस मला खरी साथ'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - 'सारेगमप'ची विजेती गायिका जुईली जोगळेकर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या मिर्ची म्युझिक अवॉर्डमध्ये जुईली रोहीत राऊतसोबतच्या उपस्थितीने चर्चेत आली. रोहीत राऊतला मिर्ची म्युझिक अवॉर्डमध्ये तब्बल २ पुरस्कार देण्यात आले. रोहीतने जुईलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्यासाठी एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

 

गेल्या 10 वर्षापासून ओळखतात एकमेकांना...
रोहीतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने जुईलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहीले, "आपण दोघे एकमेकांना गेल्या 10 वर्षापासून ओळखतो आणि आतापर्यंत मी तुझ्यासारख्या मुलीला कधीच भेटलो नाही. तु माझी बेस्ट फ्रेंड, शुभचिंतक आहेस. माझ्यावर आईप्रमाणे ओरडतेसुद्धा पण सर्वात महत्त्वाचे तु तेव्हापासून माझ्यासोबत आहेस जेव्हा मला सर्वात जास्त कोणाचीतरी गरज होती. माझ्या सावलीप्रमाणे तु माझ्यामागे उभी राहिलीस. मी माझ्या आयुष्याचे जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेस त्यावेळी तु माझ्यासोबत होतील. तुला याबद्दल किती धन्यवाद द्यावेत हे मला कळत नाही पण मी एका गोष्टीची खात्री नक्की देईल की तुझ्या चेहऱ्यावरील हे हास्य कधीच कोमेजु देणार नाही आणि नेहमी तुझ्यासोबत उभा राहिन."

 

सध्या जुईली 'सुर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातून लोकांचे मनोरंजन करत आहे. जुईली आणि रोहीत नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. जुईली फारच ग्लॅमरस आहे हे तिचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिले असता लगेचच लक्षात येते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही खास जुईलीचे काही फोटोज् घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, गायिका जुईली जोगळेकरचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...