आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rose day Spcl: मराठी इंडस्ट्रीतील \'गुलाबाची कळी\' आहे ही अभिनेत्री, फॅन्सनी यामुळे दिले असे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट स्पेशल -  आजपासून व्हॅलेंटाईन डे वीकला सुरुवात झाली आहे. आज रोझ डे निमित्त सर्वचजण एकमेकांना गुलाब देऊन शुभेच्छा देत आहेत. यात मराठी कलाकारांचाही समावेश आहे. पण आपल्याला माहीत आहे का मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीत स्वतः एक गुलाबाची कळी आहे आणि आम्ही नाही तर हे नाव तिला तिच्या फॅन्सनी दिले आहे. का दिले हे नाव..

 

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने 'तु ही रे' या चित्रपटात एका श्रीमंत मुलीची भूमिका केली होती. या रोलमध्ये ती अतिशय शोभून दिसली होती. याच चित्रपटातील गाणे गुलाबाची कळी खूप गाजले. या गाण्यातील पांढऱ्या साडीतील तिचे सौंदर्य  फारच खुलून दिसले होते. गोरापान रंग, नाजूक चेहरा आणि सुंदर शरीरयष्टी याच्या जोरावर ती फारच सुंदर दिसली. या चित्रपटातील गाणे हिट झाले आणि त्या गाण्याचे नावच तेजस्विनी पंडीतला पडले ते म्हणजे गुलाबाची कळी.

नुकताच तेजस्विनीने तिचा एक हॉट फोटो इन्सटाग्रामवर शेअर केला आहे. तेजस्विनी इन्सटाग्राम वर फार अॅक्टीव्ह आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तेजस्विनीचा रिलीज झालेला चित्रपट 'येरे येरे पैसा'ने चांगलीच कमाई केली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, तेजस्विनी सावंतचे काही खास PHOTO...

बातम्या आणखी आहेत...